बिहार निकालावरून ठाकरेंच्या नेत्याचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार असून मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एनडीए १९७ जागांवर आघाडीवर आहे. तर या निवडणुकीत महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. दरम्यान बिहार विधानसभा निवडणूक निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट काँग्रेसवर घणाघात केला.
अंबादास दानवे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली. भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या एवढंच नव्हे तर मतदार यादी घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते, विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते. बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे.


राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो.. महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली, काँग्रेस ने आता ही वृत्ती बदलावी, असे म्हणत आंबादास दानवे आक्रमक झाले आहेत.