बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार ; यावल तालुक्यातील घटना

0

यावल | तालुक्यातील मानकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजता साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात बिबट्याने बालकावर हल्ला केला. केश्या पेमा बारेला व हा सात वर्षाचा बालक मानकी शिवारातील पाटचारी जवळ असलेल्या एका शेतात कामासाठी गेला होता. इथेच दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने अकस्मात त्याच्यावर झडप घातली. यात बालक गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. शेतात काम करणाऱ्या स्त्री-पुरूषांनी आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून धुम ठोकली.

या घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवनसंरक्षण जमीर शेख, वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात आधी देखील बिबट्या दिसून आला होता. तथापि, आज थेट बालकावर हल्ला करून ठार करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. यावलच्या वन खात्याने या हिंस्त्र बिबट्याला पिंजरा लाऊन पकडण्याची मागणी आता करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.