पाथरवट समाज बहुउद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

0

भुसावळ मोहित नगर येथील सर्वे नंबर 217/3+5 येथील भुसावळ नगरपरिषदे मार्फत शिल्पकार पाथरवट समाजाला सामाजिक सभागृह बांधण्यासाठी सुमारे 17000 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर जागेवर समाजाचं बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे स्वप्न संपन्न झाले समाजाच्या शिल्पकार मंडळ संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून सदर जागेवर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला

सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा शनिवार रोजी माननीय वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री संजय भाऊ सावकारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी समाजातर्फे झालेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना माननीय संजय भाऊंनी मी भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पाथरवट समाजाला आश्वासन दिले होते की आगामी काळामध्ये समाजाचं बहुउद्देशीय सभागृहाचे काम पूर्ण होईल.. दिलेले शब्दा प्रमाणे आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याबद्दल मला मनापासून आनंद होत असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले..

यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नगरसेवक सतीश भाऊ सपकाळे ,विकी बत्रा ,विशाल जंगले, बापू महाजन, बोध राज चौधरी , अजय नागराणी, दीपक मनवाणी, दिनेश छाबडा , शिल्पकार मंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णा पाथरवट, चिटणीस संजय पेंभरे , वसुदेव पाथरवट, संस्थेचे अध्यक्ष योगेश उबाळे, उपाध्यक्ष महेश बिडकर, कार्याध्यक्ष निलेश रणदिवे, सरचिटणीस सचिन चिलवंते, खजिनदार हर्षल काळे, विश्वस्त सागर काळे, हेमंत काळे ,किशोर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद उबाळे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाथरवट समाजातील महिला पुरुष तरुण-तरुणी यांनी गर्दी केली होती..

Leave A Reply

Your email address will not be published.