भुसावळ हादरले! पुर्ववैमन्यासातून खून, एकावर झाडल्या बंदुकीच्या पाच गोळ्या
जळगाव : भुसावळ येथील खडका रोडनजीक अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात खून झाल्याची बातमी समोर आली आहे. हा खून पुर्ववैमन्यासातून झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे. तहरीन नजीर शेख (वय अंदाजे 30) असे मृताचे नाव आहे. तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे चहा घेण्यासाठी आला होता.यावेळी संशयित आरोपीने त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या. यानंतर तहरीन याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रिदम रुग्णालयात नेण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झालेले आहेत आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.