पूजा कॉम्प्लेक्सजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराची उभारणी करावी – परिसरातील लोकांची मागणी

0

पुजा कॉम्प्लेक्स आणि त्याभोवती असलेल्या विवेकानंद नगर, सद्गुरु नगर, गणपुर्ती नगर, पांडुरंगनाथ नगर, गोकुळ नगर येथील नागरिकांनी महाराष्ट्र शासनाकडे एक प्रामाणिक विनंती केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी त्यांच्या नावाचा एक भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली आहे. या प्रवेशद्वाराचे स्थान पुजा कॉम्प्लेक्सजवळ असावे, असे नागरिकांचे मत आहे.

नागरिकांनी व्यक्त केले की, हे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारे असेल, आणि यामुळे परिसराची सांस्कृतिक ओळखही बलशाली होईल. ही मागणी कॅबिनेट मंत्री मा. संजयजी सावकार यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

नागरिकांना आशा आहे की, हा प्रस्ताव लवकरच मान्य होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी तो एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल. या प्रवेद्वारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल आणि परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधिक दृढ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.