अभिनेते भरत जगताप यांना सर्वद फाऊंडेशनचा कलासाधना रत्नसेवा पुरस्कार ; बोईसर येथे समारंभपूर्वक प्रदान

0

मुंबई : डहाणू येथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नाट्य चित्रपट वाहिनी अभिनेते दिग्दर्शक भरत दुष्यंत जगताप यांना सर्वद फाऊंडेशनचा कलासाधना रत्नसेवा पुरस्कार औषध तज्ज्ञ, व्याख्याते, डाॅ. महेश अभ्यंकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सर्वद फाऊंडेशनचा हा पुरस्कार वितरण सोहळा बोईसर येथील वंजारी हाॅल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वद फाऊंडेशनच्या संचालिका डाॅ. सुचिता पाटील यांनी केले. विशेष अतिथी म्हणून सुधीर म्हात्रे, साहित्यिक अमोल केळकर उपस्थित होते.

तर जीवनगौरव पुरस्कार विनोद पाटील, उत्कृष्ट साहित्यिक अंजली म्हस्कने व सौ. विना माच्छी यांना देण्यात आला खगोल तज्ञ चंद्रकांत बुध्या घाटाळ यांना प्रदान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तिंना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सर्वद फाऊंडेशन, मुंबई ही संस्था या पुरस्कार प्रदान करण्याचे कार्य कोणाकडून एकही पैसा न घेता करीत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत राऊत, शितल संखे यांनी केले. या समारंभात पालघर जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते. डहाणू येथील भरत दुष्यंत जगताप यांनी आज पर्यंत गंगुबाई नॉन मॅट्रिक, दामिनी, चार दिवस सासुचे, समांतर, विधीलिखीत, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, अवघाची संसार आदी १९५ हून अधिक मराठी टि.व्ही. सिरीयल, तुम बिन जाऊं कहाँ, जिस देश मे निकला चाँद, आहट अशा 3 हिंदी सिरीयल्स मधुन अभिनय केला असुन, ६ मराठी चित्रपटांतून विनोदी कलाकार व कॅरेक्टर रोल केलेले आहेत. १८० व्यावसायिक व सेमी व्यावसायिक नाटकात कलाकार, दिग्दर्शक,निर्माता म्हणून कामे केलेली आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालय मंत्रालय मुंबई मार्फत राज्यात ज्या नाट्यस्पर्धा घेतल्या जातात त्या समितीवर शासना मार्फत ज्येष्ठ परिक्षक म्हणुन गेली 22 वर्षे काम करीत आहेत. स्वत: च्या श्रीस्वामीराज प्रॉडक्शन मार्फत आज पर्यंत ६५ मराठी नाटकांची निर्मिती व दिग्दर्शक व कलाकार म्हणून काम केले असुन या ग्रामीण भागातील हौशी कलाकारांना मुंबईच्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी व त्यातुन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. क्राईमडायरी, आत्मसन्मान, शिरप्या आला रे , इत्यादी टि.व्ही.सिरीयलचे दिग्दर्शन केले असुन या ग्रामीण भागातील कलाकारांना सिरीयल मधुन काम करण्याची सुसंधी उपलब्ध करून दिली.

तसेच स्वतःच्या स्वामीराज प्रॉडक्शन मार्फत सह्याद्री वाहिनी साठी स्वत: तीन सिरीयलची निर्मिती व दिग्दर्शनही केले आहे. आताची त्यांनी अभिनय केलेली झी युवा या वाहिनीवरील ‘प्रेम हे’ या सिरीयल मधून मखानी हे लोक प्रिय कॅरेक्टर केलेली त्यांची शेवटची मालिका. भरत जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या जनजागृती स्वच्छता अभियानाकरीता सहा माहिती पटाचे, हागणदारी मुक्त व गाण्यांच्या अल्बम चे दिग्दर्शन केले असुन वन विभागाची ‘यम आले धावुन’ या माहिती पटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन त्यांनी स्वत: केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या उड्डाण ह्या फेस्टीवल मध्ये गेली दोन वर्षे परिक्षक म्हणुन काम पाहिले. भरत दुष्यंत जगताप यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.