भानखेडा येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी
भानखेडा | आषाढी एकादशीनिमित्त भानखेडा येथे भक्तांची दर्शनाला गर्दी पाहायला मिळते सेनगाव तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातून भक्तजन विठुरायाच्या दर्शनाला येत असतात
आषाढी एकादशीनिमित्त भानखेडा गावात मोठी यात्राही भरते त्या यात्रेत भक्तजन मोठ्या उलासाने व आनंदाने खरेदी करतात लहान मुलं महिला पुरुष या यात्रेचा आनंद घेतात वर्षातून एकदा येणारा आषाढी एकादशीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या आषाढी एकादशीनिमित्त भानखेडा गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराला पोलीस बंदोबस चांगल्या प्रकारे दिला जातो व सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांबे यांनी चांगल्या प्रकारचा बंदोबस्त देऊन भक्तांचे मनोबल वाढविलेले भक्तांमध्ये पाहायला मिळाले