सुधीर थोरवे : झाडांवर प्रेम करणारा अवलिया !

0

मागील नऊ वर्ष सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुधीर थोरवे कुटुंबीय आपल्या मित्रमंडळी समवेत करत आहेत.सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्यांनी दीडशे झाडांचे वृक्षारोपण कर्जत येथे शिरवली ह्या ठिकाणी केले.यावर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात कर्जतचे वृक्षप्रेमी शरद पवार तसेच वनविभागाचे विभाग प्रमुख समीर खेडेकर, जितेंद्र चव्हाण व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.

मुंबईत पावसाचा जोर कायम असताना सगळ्यांच्या मनात निघायचे की नाही याची धाकधूक होती. परंतु वैशाली थोरवे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी कर्जत येथे मार्गक्रमण केले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथून 50 जणांच्या चमूने आपापल्या गाडीने सकाळी साडेनऊच्या दरम्यान शेळके सभागृहातील आवारात आपल्या न्याहारीची शिदोरी चा आस्वाद घेतला .विलास व शैला आचरेकर , अनिता, शोभा, सरीता आणि स्नेहल यांनी न्याहारी वाटपाची व्यवस्था चोख बजावली. तद्नंतर आम्ही वृक्षारोपण करावयाच्या ठिकाणी पोहोचलो.

वनविभागाने आखून दिलेल्या जागेत आम्ही तीन ते पाच जणांचे विविध ग्रुप पाडून वृक्षारोपणाला सुरुवात केली. सर्वप्रथम वृक्षारोपण कसे करायचे याविषयी नवोदिताना माहिती सांगण्यात आली.मुंबईत जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी कर्जत येथे निसर्गाने आम्हाला साथ दिली. सभोवतालची हिरवळ, मध्येच येणारी पावसाची सर, हवेतील थंडावा या सर्व निसर्गरम्य वातावरणात आमच्याचमुने एक आगळ्यावेगळ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात केली.

कुदळ, फावडी घेऊन खड्डे पाडणे हे काहीजणांना नवीनच होते. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उत्साही वातावरणात आम्ही जवळजवळ १५० झाडे लावली.

श्रम परिहारानंतर आम्ही कर्जतच्या प्रसिद्ध वडापावचा आस्वाद घेतला. काही जणांनी शेजारीच वाहत असलेल्या नदीत डुंबण्याचा मनमुराद आनंद घेत आपला थकवा घालवला. तदनंतर वनभोजनाचा आनंद सगळ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात घेतला. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था वैशाली थोरवे, ज्योती आणि रूपाली काशिद, हेमांगी खानोलकर आणि यांनी चोख बजावली.

सर्वेश बेनकर, हर्ष आचरेकर, श्यान्या शर्मा, श्रेयांश भल्ला, निखिल व श्रेया चांदवडकर ह्या यंग ब्रिगेडरची ऊर्जा वृक्ष लागवडीसाठी वाखाणण्याजोगी होती. तसेच आपल्या कुटुंबीयासमवेत आलेले शेखर पडते, प्रदीप काशीद, श्याम महामुनी, महेश आठल्ये, आतिश शर्मा, अजय बल्ला, संदीप वाणी, विट्ठल भास्कर, लक्ष्मीकांत, दिलीप पटेल,अनिल पाटील, रवी गवळी, विशाल चव्हाण, व प्रशांत गायकवाड यांनी पर्यावरण बचावासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न त्यांना खूप मोठा आनंद देऊन गेला.
-प्रदीप काशीद, अंधेरी (मुंबई)

Leave A Reply

Your email address will not be published.