जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कुरारपाडा येथील आदिवासी पाड्यावर खाऊ व कपडे वाटप

बदलापूर | ग्रामीण भागातील चरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कुरारपाडा येथील एका आदिवासी पाड्यावर,कल्याण स्वामी गौशाळा लव्हाळीच्या माध्यमातून तेथील गरीब व गरजु मुलांना व महिलांना जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने खाऊ व कपडे वाटप करण्यात आले.सर्व प्रथम…

लँडिंगवेळी विमानाचा भीषण अपघात; १७९ जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियामध्ये आज लँडिंगवेळी मोठी विमान दुर्घटना झाली. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा भीषण अपघात झाला असून या अपघाताच्या दुर्देवी घटनेत आतापर्यंत १७९…

कंत्राट देण्याच्या बहाण्याने रेल्वे कंत्राटदाराची ४१ लाखांत फसवणूक

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच भुसावळ येथली एका रेल्वे ठेकेदाराची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लोखंडी सळईचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली…

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (26 डिसेंबर) अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचे निधन…

चाळीसगावात दोन लाखाची लाच घेताना सरपंच, लिपीकसह पंटर जाळ्यात

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईत ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपीक आणि एक पंटर या तिघांना दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. याबाबत असे…

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

जळगांव : - मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय…

जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव । भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow)…

४२ वर्षाच्या जनसेवेनंतर रविंद्र नागे सेवानिवृत्त : मंत्रालयाच्या उपहारगृहात बजावली सेवा

मुंबई ।रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झाले व सन १९८४ पासून विधान भवन उपहारगृहामध्ये कार्यरत आहेत. विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी,…

बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटला: बुलढाणा जिल्ह्यातील घोटाळा

बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये तलाठ्यांनी मिळून बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या…

हिवाळ्यात पावसाळा! 27-28 डिसेंबरला गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस, कोणत्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

जळगाव । 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि…