चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त वाद; एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ बदली

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमी यांच्यात शाब्दिक चकमकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाच्या दरम्यान एका मुद्द्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि शिवप्रेमी यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही वेळातच तणाव निवळला आणि कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.