मुक्ताईनगर तालुक्यात शेतकरी अनुदान वाटपात मोठा गैरव्यवहार; एक जण ताब्यात

0

मुक्ताईनगर । एकीकडे शेती पिकांना भाव नाही, त्यातही निसर्गाच्या प्रकोपामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात आहे. त्यातही शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण समोर येत आहे. असाच एक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातून समोर आला आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या शेतकरी अनुदानात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या आरोपानंतर याप्रकरणी तहसीलदारांनी फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उचंदा (ता. मुक्ताईनगर) येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तथ्य आढळून येत असल्याचा दुजोरा दिला होता. याप्रकरणी शनिवारी तहसीलदारांनी फिर्याद दिल्यानंतर या अनुदान घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातबारावर नाही नाव तरी नुकसानभरपाईचे अनुदान
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा आणि बोरखेडा येथील काही शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत. तरीही त्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान वर्ग करून अपहार करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.