एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे गट आक्रमक, राज्यभरात चक्काजाम आंदोलन

0

महायुती सरकारने एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. आता भाडेवाढ प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात महायुती सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन छेडले आहे. कल्याण पुणे, सोलापूर, नाशिक अशा राज्यभरातील विविध ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

कल्याणजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एसटीच्या गाड्या आडवून निषेध नोंदवला. भाडेवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांकडून भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी होत आहे.

नवी मुंबईच्या पनवेल एसटी डेपोमध्येही ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाड्यामध्ये १५ टक्क्यांनी वाढ केल्याने चक्काजाम आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चक्का जाम केल्याने पनवेल डेपो परिसरात वाहतूक कोंडी झाली. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना डेपोतून हटवले.

Leave A Reply

Your email address will not be published.