दिवा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर साहेबांचे वाढदिवसा निमित्त उत्साहात स्वागत
आजच्या धकाधकीच्या काळात संविधान किंवा संविधानाशी निगडित असलेल्या गोष्टी पावलो पावली घडत आहेत. आणि खरोखरच संविधानाच रक्षण करण्याचे मंदिर म्हणजेच पोलीस स्टेशन समजल्या जाते. त्यात काही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावण्या मध्ये कसलीही कसर कमी ठेवत नाहीत. असंच मुखाने जनतेची सेवा करणं आणि मनमोकळे पनाने सर्वांना न्याय देणे यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अमोल कोळेकर साहेबांचे नाव अग्रगण्य म्हणून घेतल्या जाते. याही वर्षी त्यांचा जन्मदिवस साध्या आणि सरळ पद्धतीत दिवा येथील जनसेवकां मार्फत साजरा करण्यात आला.
त्यात प्रामुख्याने सम्यक दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय जयसिंग जी कांबळे साहेब , आदरणीय आदर्श शिक्षक जोगदंड साहेब,महिला मंडळाच्या डॅशिंग रणरागिणी सौ. सुरेखा जी तोरणे , समाजसेवक आदरणीय बालाजी साहेब, व चित्रपट निर्माता वाघ साहेब उपस्थित होते. सत्कार सोहळ्यातील प्रमुख पाहुण्यां मध्ये आदरणीय (ए.पी.आय.) खतेले साहेब, आदरणीय (ए.पी.आय.) सोनवणे साहेब, आदरणीय (पीएसआय ) सावंत साहेब , आणि सत्कार मूर्ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोलजी कोळेकर साहेब,तसेच कर्तव्यावर असलेला सन्मानणीय सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होते. शाल आणि श्रीफळ देऊन कांबळे साहेब आणि बालाजी साहेब यांनी साहेबांचे स्वागत केले तर तोरणे ताईंनी साहेबांना केक भरवून आयुष्या बद्दल औक्षण केले.
जीवन खूप अनमोल आहे तुम्ही कुठल्या पदावर आहात आणि त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या पदाचा जनते साठी काय उपयोग केला जातो आणि तो कोळेकर साहेब तंतोतंत करतात या शब्दांमध्ये आदरणीय निर्माता विशाल जी वाघ साहेबांनी, साहेबांचे कौतुक केले. संविधानाच्या तत्त्वावर चालणारे कोळेकर साहेब यांना भरपूर आयुष्य लाभो या शब्दांमध्ये निर्माता विशाल वाघ यांनी शुभेच्छा प्रदान करून कार्यक्रमाची सांगता केली. आणि जयसिंग जी कांबळे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले…