अजित पवार गटातील अजून एका मंत्र्याचा राजीनामा

0

मुंबई । महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावरील आरोपांमुळे अडचणीत आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. तर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडलेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्याचदरम्यान अजित पवार गटातील अजून एका मंत्र्याने राजीनामा दिलाय.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. पालकमंत्री पदाचे वाटप होताना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं.

मुश्रीफ हे मूळचे कोल्हापूरमधील कागल येथील असल्याने त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांनी सेटिंग लावली होती. मात्र त्यांना कोल्हापूरसोडून ६०० किलोमीटर अंतरावरील वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. पण यावर ते नाराज होते. हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते भाजपसह आपल्याच पक्षश्रेष्ठींविरोधात नाराज होते. नाराजी उफाळून आल्याचं बोललं जातंय, हसन मुश्रीफ यांनी वाशीमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.