लँडिंगवेळी विमानाचा भीषण अपघात; १७९ जणांचा मृत्यू
गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियामध्ये आज लँडिंगवेळी मोठी विमान दुर्घटना झाली. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा भीषण अपघात झाला असून या अपघाताच्या दुर्देवी घटनेत आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त the guardian यांनी दिले आहे. फक्त दोन जणांना वाचवण्यात यश आलेय. अपघातामधील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
अपघात नेमका कशामुळे झाला?
दक्षिण कोरियामध्ये विमान लँडिंगवेळी झालेल्या दुर्घटनेविषयी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. स्थानिक स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे मुआनमध्ये जेजू एअर क्रॅश झाल्याची शक्यता आहे. अपघाताचे कारण प्रतिकूल हवामानासह पक्ष्याने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
#BREAKING An Image from the Crash Site of Jeju Air Flight 2216 at Muan International Airport in South Korea, showing the Tail of the Aircraft engulfed in Flame@fastnewsnet pic.twitter.com/PBNOEyx0DW
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 29, 2024
दक्षिण कोरियातील yonhap या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यामध्ये १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. ही दुर्घटना दक्षिण-पश्चिमी शहरातील मुआन विमानतळावर घडली. यामध्ये १७९ जणांचा मृत्यू झाला. एक क्रू मेंबर आणि एका प्रवाशाला वाचण्यात यश आलेय. लँडिंगच्या वेळी रनवेवर अचानक विमान विमानतळाच्या भिंतीला जाऊन धडकले. जेजू एअरचे विमान थायलंडबून परत येत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले अन् भींतीला जाऊन धडकले.