अहिल्यानगरमधील कोटला गावा मध्ये मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज

0

अहिल्यानगर । अहिल्यानगरमधील कोटला गावामधून एक मोठी बातमी समोर आलीय. ज्यात मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते. मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंचे नावाची विटंबना केल्या प्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झाला होता.

मुस्लीम समाजाकडून अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी मुस्लिम आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला

या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं. कुणीही अफवांवर वर विश्वास ठेवणे पोलिसांनी आवाहन केले. तसेच हे कृत्य करणाऱ्या एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.