शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा भरपूर पाऊस, पिके साधारण राहतील ; भेंडवळचे भाकीत समोर
बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणीकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचं लक्ष लागून असते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी केली जात असून यातून पाऊस, पीक पाण्यासह विविध भाकीत वर्तवली जातात. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात. अखेर आज शनिवारी सकाळी भेंडवळचे भाकीत समोर आले आहे.
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.
कसा असेल पाऊस
या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलं आहे.
पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे.
चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे.
कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आलं आहे.
पीक पाण्याचा नियोजन आणि भाकीत पुढील प्रमाणे
ज्वारी सर्वसाधारण असल्याचं भाकित सांगण्यात आलंय.
तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे.
मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल.
यंदा तीळ चांगला असेल.
एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल
बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल.
जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे.
गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल.
हरभरा चांगल पिक मात्र भाव निश्चित नाही.