जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव | राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.
या सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महसूल विभागातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या उल्लेखनीय सेवा देणाऱ्या ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नायब तहसिलदार, सहायक महसूल अधिकारी, लघुलेखक, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक, वाहन चालक, पोलिस पाटील, कोतवाल, शिपाई, अव्वल कारकून आदींचा समावेश होता.
प्रामुख्याने सत्कारप्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नायब तहसीलदार राहुल भानुदास सोनवणे , करमणूक कर शाखा,जळगाव, प्रिती सदाशिव लुटे- भुसावळ, रमेश प्रभाकर देवकर – भडगाव, संदेश बी. निकुभ- चाळीसगाव, राहुल वाघ – जळगाव, आर. डी. पाटील – रावेर, देवेंद्र भालेराव – एरंडोल, प्रशांत सुभाष धमके – अमळनेर, तसेच धनंजय खेवलकर – विधी अधिकारी – जिल्हाधिकारी कार्यालय, प्रेमनाथ धनसिंग पाटील – लघुलेखक, एरंडोल भाग, नरविरसिंह रावळ – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मिलिंद बुवा – सहायक महसूल अधिकारी, स्वीय सहायक – जिल्हाधिकारी कार्यालय, अमोल जुमडे – सहायक महसूल अधिकारी, DPPM शाखा, परविन तडवी – सहायक महसूल अधिकारी, (रोहयो) शाखा, दिपक चौधरी – सहायक महसूल अधिकारी, ज्योती सुरवाडे – सहायक महसूल अधिकारी, फैजपूर उपविभाग, वरद वाडेकर – सहायक महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, पाचोरा, गजानन शिराळे – सहायक महसूल अधिकारी, बोदवड, प्रदीप आडे – सहायक महसूल अधिकारी- जामनेर, महेश आर. जाधव – सहायक महसूल अधिकारी- पारोळा, योगेश नन्नवरे – सहायक महसूल अधिकारी, चोपडा, अशोक ठाकरे – सहायक महसूल अधिकारी – अमळनेर, प्रविण मोरे – सहायक महसूल अधिकारी – चाळीसगाव, महेश मधुकर नेहे – सहायक महसूल अधिकारी या अधिकाऱ्यांसह इतर सत्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी महसूल विभागातील आपापल्या कार्यक्षेत्रात नॉन-क्रिमीलेयर तपासणी, रोजगार हमी योजना अंमलबजावणी, शिबिरे, आपत्ती व्यवस्थापन, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, भू-संपादन प्रक्रिया, महसूल न्यायालये अशा विविध महत्त्वपूर्ण बाबतीत उल्लेखनीय योगदान दिले.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात “महसूल सप्ताह” साजरा करण्यात आला असून या कालावधीत महसूल विभागामार्फत विविध जनहित उपक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकाभिमुख व पारदर्शक सेवा हेच विभागाचे खरे ब्रीद असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रामाणिक व सेवाभावी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आला.