शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श शाळा मोडाळेचे घवघवीत यश
परी विकास शेंडगे हिचा प्रथम क्रमांक
इगतपुरी | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिक्षवृत्ती इयत्ता पाचवीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे येथे परी विकास शेंडगे हिचा प्रथम क्रमांक आला आहे. सं 2024-25 या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा मोडाळे येथील इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
शाळेतील 14 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 12 विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले असून 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत यामध्ये सर्वात जास्त ७४ टक्के गुण मिळवून परी विकास शेंडगे प्रथम क्रमांक आला आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तेजस गोऱ्हे, वेदिका बोडके, ज्ञानेश्वरी ढोन्नर, वैष्णवी धात्रक, अक्षदा बोडके ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. दरम्यान या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तत्कालीन वर्गशिक्षक व पिंपरी सदो शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तर मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रभागा तुपे, कोटक एज्युकेशन फाऊंडेशनचे किसन देवरे, सुभाष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेतील शिक्षक माधुरी पाटील, अनिल बच्छाव, संतोष गंबोते, सुनीता सोनवणे, अविनाश शिंदे, शशिकांत आंबेकर, भालेराव सर, अहिरे सर, खादगीर सर उपस्थित होते.