मोठी बातमी ! आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई । सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या वतीनं उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. सी.पी. राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत विजय झाला. सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती बनले आहेत
दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुजरातचे राजपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
आचार्य देवव्रत कोण आहेत?
ही नियुक्ती तात्काळ प्रभावी होईल. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले सीपी राधाकृष्णन ९ सप्टेंबर रोजी भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आले आणि त्यांनी इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी, जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत, यांच्याविरुद्ध ४५२-३०० मतांनी विजय मिळवला. सीपी राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारतातील दुसऱ्या सर्वोच्च संसदीय पदासाठी निवडलेले उमेदवार होते, जे अखेर उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाले.