चोपड्यात भरधाव कारच्या धडकेत दोन सख्या भावांचा मृत्यू

0

चोपडा । चोपड्याहून नवा मोबाइल घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या दोन सख्या भावांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने वर्डी येथील आदिवासी कुटुंबातील दोन सख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना चोपडा-यावल रस्त्यावर घडली.

या घटनेबाबत असे की, यावल-चोपडा मार्गावर वर्डी फाटा ते वडती फाटा दरम्यान चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात अडावदकडून चोपडाकडे जाणारी एम.एच.०४ एच. एफ. ८२९६ चार चाकीने समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८) रा. वर्डी ता. चोपडा हे दोन्ही सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

अपघात झाल्यानंतर तात्काळ अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठले. वाहतूक सुरळीत केली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशांत पाटील (मामू) यांनी दोघांना रुग्णवाहिकेत टाकले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. पवन पाटील यांनी दोघांना मृत घोषीत केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी शविच्छेदन केले.

याबाबत चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हा तेथून शून्य क्रमांकाने अडावद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.