विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला आठ वर्षे सश्रम कारावास

0

अमळनेर । विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या चुंचाळे (ता.चोपडा) येथील शिक्षकास अमळनेर जिल्हा न्यायाधीश पी. आर.चौधरी यांनी आठ वर्षांचा सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणावरुन तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या चर्चा रंगत आहे.

चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनील संतोष भागवत रा. देशमुख नगर, चोपडा याने दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. तसेच मुलीला फोन करून तिच्याशी घाणेरड्या शब्दात बोलला. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील भागवत याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला.

हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले. तपासी अधिकारी, पीडितेचा जवाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राहा धरत न्या.पी.आर.चौधरी यांनी आरोपी सुनील भागवत याला आठ वर्षाचा सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकरणात पैरवी अधिकारी माणून नितीन कापडणे, राहुल रणधीर, उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.