इगतपुरीतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत नायब तहसीलदारांना निवेदन

0

इगतपुरी | 

राज्यात  ‘शिक्षक दिनाचा’ उत्साह असताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची-प्रश्नांची वारंवार शासनाच्या विविध पातळ्यांवर सनदशीर मार्गाने अर्ज, निवेदन देऊन सुद्धा तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी बहिष्कार, आंदोलन या मार्गाने संघटनेने आजपर्यंत केलेल्या विविध सनदशीर मार्गातून शासनाकडून दिलेल्या वेळोवेळी आश्वासनातून प्रश्न मार्ग लागत नसल्यामुळे ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इगतपुरी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने नायब तहसिलदार धनंजय लचके यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे समन्वयक प्रा.नामदेव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देऊन शिक्षकांच्या तातडीच्या या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले यात प्रामुख्याने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ, विना, तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांचे समायोजन, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला किंवा शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ, अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ, इतर लाभांसाठी ग्राह्य धरावा अशा विविध १७ मागण्यांचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.