जळगावमध्ये खळबळ : बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला चोप

0
जळगाव । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी आज जळगावकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावमधील एका मतदान केंद्रावर हा तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. तो बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा संशय अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आला. यावरून बाचाबाची होऊन संतप्त कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मतदान केंद्राच्या परिसरातच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जमावाच्या तावडीतून त्या तरुणाला सोडवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. तो या ठिकाणी मतदानासाठी का आला होता आणि त्याच्याकडे असणारी कागदपत्रे अधिकृत आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.