जळगावमध्ये सोन्यात ६५००, चांदीत ३९ हजार रूपयांनी वाढ
जळगाव । सोने आणि चांदी खरेदी प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दराने आज बुधवारी नवीन ऐतिहासिक उच्चांक केला. दोन्ही धातुंचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहक अवाक झाले. सुवर्ण व्यावसायिकांनाही मोठा धक्का बसला.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी १८५४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ४५ हजार ०२४ रूपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा २०६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४५ हजार २३० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. त्यात बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १५४५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख ४६ हजार ७७५ रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला. सोन्यात पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे ६४८९ रूपयांची वाढ झाल्याची नोंद घेतली गेली.


चांदीचे दर किती वधारले ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी १० हजार ३०० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीने जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ६७ हजार ८०० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. मंगळवारी आणखी ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीने जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. त्यात बुधवारी सकाळी पुन्हा तब्बल १५,४५० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने दोन लाख ८८ हजार ४०० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला. चांदीत पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे ३९ हजार १४० रूपयांची वाढ झाल्याची नोंद घेतली गेली.