महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

0

मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये  मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योगआस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचे  परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे.

 

महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासनाची कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहीलअसे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

या शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगारअधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योगऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकानेहॉटेलनिवासस्थानेआयटी कंपन्यामॉल्सशॉपिंग सेंटर्सकिरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

 

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबईठाणेनवी मुंबईउल्हासनगरकल्याणडोंबिवलीभिवंडीनिजामपूरमीराभाईंदरवसईविरारपनवेलनाशिकमालेगावअहिल्यानगरजळगावधुळेपुणेपिंपरीचिंचवडसोलापूरकोल्हापूरइचलकरंजीसांगलीमिरजकुपवाडछत्रपती संभाजीनगरनांदेडवाघाळापरभणीजालनालातूरअमरावतीअकोलानागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.