दर्शनासाठी जाताना काळाचा घाला; भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
चाळीसगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात एक भीषण अपघात झाला. चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आले. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे दर्शनासाठी एका मित्रांचा ७ जणांचा ग्रुप जात होता. देवदर्शनासाठी निघालेल्या या तरुणांच्या आनंदावर विरझन पडले. चारचाकीने निघालेल्या या तरुणांवर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला.
या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.