जळगावमध्ये सोने-चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
जळगाव । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ होताना दिसत असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. दरम्यान जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दोन्ही धातूंमध्ये मोठी दरवाढ झालीय.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने दरात ८२४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४१ हजार ४१९ रूपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी सोमवारी दिवसभरात १८५४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार ५९५ रूपयांपर्यंत पोहोचले होते.


चांदीच्या दरात किती वाढ?
सोन्यासोबतच आज चांदी दरात मोठी वाढ झाली. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळच्या सत्रात चांदीत ४३२० रूपायांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५३ हजार ५९० रूपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल सोमवारी दिवसभरात तब्बल ६१८० रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४९ हजार २६० रूपयांपर्यंत पोहोचले होते.
दरवाढीचे कारण काय?
व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कडक धोरणाचा परिणाम आता जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होत आहे. सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकणारा कल वाढल्याने सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.