जळगावसह राज्यात ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा वाढला

0

जळगाव/मुंबई । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला आहे. जळगावच्या किमान तापमानात एकाच दिवसात 5.4 अंशांनी वाढ झाली. यामुळे रविवारी जळगावचे किमान तापमान १५.५ अंशावर पोहोचले आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश शहराचा पारा १० अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली आहे. तुरळक ठिकाणी रात्री उशिरा आणि पहाटे पावसाच्या थेंबांनी शिंपण केल्याचे दिसून आले. उत्तर पुणे आणि नाशिकच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा थंडीचा जोर ओसरल्याची स्थिती आहे.

शनिवारी पहाटे किमान तापमान ९.१ अंशांवर होते तर रविवारी पहाटे त्यात तब्बल ५.४ अंशांनी वाढ होऊन तापमान १५.५ अंशांवर पोहोचले. परिणामी रविवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली नाही. जळगाव जिल्ह्यात ५ ते ९ जानेवारी दरम्यान किमान तापमान ११ ते १५ अंशांच्या दरम्यान राहील. कमाल तापमान २९ ते ३२ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता अधिक वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.