जळगाव महापालिकेत आमदार भोळेंचे सुपुत्र विशाल भोळे बिनविरोध

0

जळगाव । जळगाव महापालिकेत भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे ७ क मधून बिनविरोध निश्चित झाले आहेत.त्यांचे विरोधातील ४ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ही निवड निश्चित झाली आहे.

जळगाव महापालिकेत आतापर्यत महायुतीचे सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात भारतीय जनता पार्टीचे २ व शिवसेना शिंदे गटाचे ४ असे एकूण ६ उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत.

यामध्ये भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी १२ ब मधून विजयाचा श्री गणेशा केल्यानंतर गुरुवारी माघारीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख आणि डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निश्चित झाले. यानंतर आज माघारीच्या अंतिम दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सरला सुनील सोनवणे यांनी आपला अर्ज माघारी घेतला.त्यामुळे शिवसेनेचे रेखा चुडामण पाटील हे बिनविरोध निश्चित झाले आहेत.

यानंतर आता प्रभाग क्रमांक ७ क मध्ये शेवटच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल सुरेश भोळे यांचा विजय निश्चित झाला आहे. यानंतर विशाल भोळे यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या बाहेर जल्लोष साजरा करत महायुतीच्या एकजूटीचा विजय असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.