जळगाव महापालिकेत शिंदे गटाची आणखी एक जागा बिनविरोध !
शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी हे प्रभाग ९ अ मधून झाले बिनविरोध !
जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चौधरी यांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. मनोज चौधरी हे चौथ्यांदा महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करत आहेत.


आज सकाळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे हेही शिंदे गटाकडून बिनविरोध झाले आहेत. सध्याच्या घडीला जळगाव महापालिकेत भाजपाचा एक उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दरम्यान मनोज चौधरी बिनविरोध होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून जल्लोष केला. मनोज चौधरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.