जळगावात अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा

0

जळगाव । जळगाव महापालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अगदी काही तास शिल्लक असताना महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाहीय आहे. याच दरम्यान, अजित पवार गटात मोठी फूट पडल्याचं दिसून आले.

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीत जागा लढण्यावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय.

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे यावर त्याला दुजारा दिला असून पक्ष कार्यालयात राजीनामा दिल्याचे सांगितलं. दरम्यान महापालिका निवडणूक लढवून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये दुफळी वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.