ललित कोल्हेला दिलासा नाहीच! न्यायालयाकडून जमीन अर्ज रद्द
जळगाव । जळगाव बनावट कॉल सेंटर प्रकरणी कारागृहात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेचा न्यायालयाने जमीन अर्ज नामंजूर केला आहे. यामुळे आता त्यांना निवडणूक लढवायची असल्यास तर जेलमधूनच निवडणूक लढावी लागणार आहे.
दरम्यान, जळगावातील आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरप्रकरणी जळगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. जळगाव शहरालगतच्या माजी महापौर ललित कोल्हेच्या फार्म हाऊसवर छापा टाकून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. संघटितपणे कट रचून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्याचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपात म्हटले आहे.


याच पार्श्वभूमीवर ललित कोल्हे यांनी जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने रद्द केला आहे. हा गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. पोलिस प्रशासनाचा तपास सुरू असून प्रथमदर्शनी तिघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. अजूनही काही प्रमुख संशयितांचा शोध घेणे बाकी आहे. या पोलिसांच्या म्हणण्यावर न्यायालयाने ललित कोल्हेसह सूत्रधार अकबर व हॅण्डलर आदिल या तिघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहे
त्यामुळे त्यांना अजून काही काळ कारागृहात काढावा लागणार आहे येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना कारागृहातूनच आपली निवडणूक पार पडावी लागेल अशी चिन्हे दिसू लागलेली आहे आज न्यायालयामध्ये कोल्हे यांची बाजू एडवोकेट सागर चित्र यांनी ठेवली तर सरकारी पक्षातर्फे तर सरकारी पक्षातर्फे सुनील चोरडिया यांनी पक्ष मांडला.