29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात
राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तर अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, पालिका निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही.