ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा हात म्हणजेच मयूर आणि पुष्कर ह्यांच्या इनाटो पेंट्सचा जादुई अविष्कार
असं म्हटल्या जाते की घराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि महालक्ष्मीची बरकत वाढवण्यासाठी अध्यात्मिक शास्त्रा प्रमाणे गायीच्या गोमूत्रा चा पुरेपूर फायदा होतो. पण तुम्हाला वाचतांना व ऐकताना नवल वाटेल कि जळगाव चे खान्देश रत्न, पुष्कर यावलकर आणि मयूर राजपूत यांच्या प्रयत्नातून इनाटो पेंट्स च्या उत्पादनाचा अक्षरशः आश्चर्य जनक धुमाकूळ चालू आहे. पुष्कर यावलकर हे खूप लहान वय असूनही चित्रपट निर्माता सुद्धा आहेत.
सोबतच इंजिनियर असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अविष्कार बनवून मार्केटला उत्पादन रूपामधून जनतेला कसा फायदा देता येईल आणि शासन दरबारी सुद्धा कशी पत राखल्या जाईल ते याच प्रयत्नात असतात. तर ते इतक्या लहान वयात उद्योगपती बनण्याच्या पाठीमागे त्यांचे आजोबा, जळगाव वृत्तचे संपादक कमलाकर वाणी साहेब यांचा वरदहस्त असून ते कुठल्या ही क्षेत्रात उंच भरारी घेतात आणि इनाटो सारख्या पेंट्सला अविष्काराचे रूप देऊन समाज कार्याला आर्थिक बळ देतात.ह्या प्रकल्पा तुन गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली पेंट ची निर्मिती झाली आहे.


हा पेंट आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम न करतांना, भिंतींना सुशोभित करण्यासाठी, पर्यावरणाला सुगंधीमय वातावरणात फेरबदल करण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रात पुणे आणि कर्नाटक सारख्या ठिकाणी या संस्थापकांनी बुद्धीच्या विकासाने रासायनिक बदल करून उद्योगाचा उगम केला आहे. यामुळे गोशाळांच्या शेण विक्रीला मागणी तर आलीच परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा बदल झाला. रासायनिक प्रक्रियांच्या बऱ्याच अयशस्वीतेच्या ठोकरा खाल्ल्यानंतर शेवटी लाखाने चालू केलेला व्यवसाय आज करोडो च्या घरामध्ये उलाढाल करत आहे. 225 ते 550 रुपये किमतीच्या या पेंट ची वॉरंटी कुठल्याही मान्यता प्राप्त ब्रँडेड पेंट पेक्षा पाच ते बारा वर्षापेक्षा कमी नाही.
जनसामान्यांच्या आरोग्याच्या विचारासाठी कार्बन फूट प्रिंट कमी करून पेंटिंग उद्योगात अमुलाग्र बदल करायचा आणि पेंटिंग उद्योगात खानदेश रत्नचा शीक्का मारून क्रांती करण्याचा उद्योगपती पुष्कर आणि मयूर यांचा मानस असल्यामुळे त्यांच्या साठी जळगाव जिल्ह्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असेच ते जिल्ह्यासाठी उत्तरोत्तर प्रगती करत राहो. आणि जनसामान्यां च्या हृदयात जागा करो या शब्दात निर्माता निर्देशक विशाल वाघ साहेब यांनी त्यांचे शब्द सुमनां नी कौतुक जाहीर केले.