नागरिकांनो काळजी घ्या ! जळगावमध्ये थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट
जळगाव । उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. जळगाव, निफाड, धुळे, नाशिकसह अनेक ठिकाणी तापमान ७ ते ९ अंशांपर्यंत घसरले आहे. यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असून हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून राज्यात थंडीच्या तीव्र लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणाचा पारा ७ अंशावर खाली घसरल्याने निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये तापमान अधिकच घसरल्याने दबबिंदू गोठल्याचे दिसून आले. आज (ता. १९) उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा आला आहे. त्याशिवाय उर्वरित राज्यात गारठा कायम राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीचा इशारा देण्यात आळा आहे.


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पारा दहा अंश आणि त्यापेक्षा कमी झाला आहे. उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक किमान तापमान जळगावमध्ये नोंदवले गेलेय. जळगाव मध्ये ७.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
कुठे कुठे थंडीचा इशारा?
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली.
राज्यातील थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे : धुळे ६.२, जेऊर ७, परभणी (कृषी) ७, जळगाव ७.१, निफाड ८.३, अहिल्यानगर ८.४.
जळगाव जिल्ह्यात पहाटेचा पारा सात अंशांवर
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. आज पहाटे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी तापमान ७ ते ८ अंशांपर्यत खाली आल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून, जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जळगाव येथे ७ ते ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान १० ते १३ अंशांपर्यंत घसरले. हवामान विभागाने अजून दोन तीन दिवसांपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.