पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपामुळे खळबळ, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

0

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा गंभीर आरोप ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त ३०० कोटी रुपयांनी खरेदी केली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तर जागेचे मूळ मालक सांगतायत, ही जागा महार वतनाची आहे त्यानंतर ही जागा सरकारने घेतली. आमचे पूर्वज अशिक्षित असल्यामुळे शितल तेजवानी नावाच्या महिलेने जागेचा ताबा मिळवून देते सांगून सगळ्यांकडून पावर ऑफ पॅटर्न करून घेतली.

शितल तेजवानी या महिलेने ही जागा अमीडीया कंपनीला दिली. या जागेच्या सातबारावर अद्याप आमची नावे आहेत. आमची जमीन आम्हाला मिळावी. अशी मागणी मूळ मालकांनी केली आहे. त्यामुळे या जमीन व्यवहार प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही किंवा घोटाळा केला नाही अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.