रीलच्या नादात गमावला जीव, ट्रेनच्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू; जळगाव हादरलं
रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; पाळधी नजीक घटना
जळगाव । रील बनवण्याच्या नादात धरणगाव तालुक्यातील पाळधीच्या दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल झाला होता. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रुळावर पडले होते.


हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार असे मृत तरुणांची नावे आहेत. ते दोघेही १८ वर्षाचे होते. ते पाळधी गावात रेल्वे गेट जवळील भागात राहत होते. पाळधी येथील रेल्वे गेटजवळ ते रेल्वे रुळावरून बसून रिल बनवत होते. मात्र रिल बनवण्याच्या वेडापायी त्यांचा जीव गेलाय.
पाळधी येथील रेल्वे गेटजवळ रिल बनवत असताना त्यांना अहमदाबाद एक्सप्रेसच्या धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कानात हेडफोन लावून रुळावर बसून रिल बनवत होते. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.