राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस कोसळेल; जळगाव जिल्ह्यात अशी राहणार स्थिती?

0

मुंबई/जळगाव । मान्सूनने राज्याला रामराम ठोकला असला तरी, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढले आहे. या बदलामुळे राज्यात पुढील 4 दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

आज 25 ऑक्टोबर रोजी राज्यातील 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

लक्ष्मीपूजनानंतरच्या दोन दिवसांत म्हणजे 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. यातच हवामान खात्यानं 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुणे वेधशाळेने वर्तवलेला जिल्हावार पावसाचा अंदाज
25 ऑक्टोबर: नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, नागपूर.
26 ऑक्टोबर: मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड.
27 ऑक्टोबर: धुळे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.
28 ऑक्टोबर: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड.

Leave A Reply

Your email address will not be published.