भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0

नंदुरबार ! एकीकडे दिवाळीला सुरूवात झाली असून आज धनत्रयोदशीचा सण आहे.या सणानिमित्त राज्यात, लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून मात्र धनतेरसच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा घाटात भीषण अपघात झाला. अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात होऊन ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नंदूरबार अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला. चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

या वाहनात २२ ते २३ प्रवास करीत होते. या अपघातामध्ये ६ भाविकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १५ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांन घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून सर्व मदत केली जात आहे. जखमींची प्रकृती पाहता मृताची संख्या वाढू शकते, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.