राज्य महामार्ग शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षपदी नागेश गायकर तर सचिवपदी गोरख वाजे यांची निवड

0

इगतपुरी : घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय राज्य महामार्ग शेतकरी कृती समितीच्या कोअर कमेटी अध्यक्ष पदी नागेश गायकर व सचिवपदी गोरख वाजे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घोटी ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासनाकडून शेत जमीनी मोजण्यात येत आहे.

या वाढीव रस्त्यासाठी जमीनी संपादीत झाल्यास शेतकरी भुमीहीन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जमीनी देण्यास या मार्गावरील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे हरकत घेण्यासाठी राज्य महामार्ग शेतकरी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीच्या अध्यक्षपदी मनसेचे नागेश गायकर व उपाध्यक्षपदी सोपान परदेशी, विवेक कुटके यांची निवड करण्यात आली असुन सचिवपदी गोरख वाजे, सहसचिवपदी भारत कोकणे, खजिनदार पदी भास्कर पचारणे यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीचे स्वागत सर्व शेतकरी बांधवांसह ॲड. रतनकुमार इचम, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव उमेश खातळे, कृऊबा समितीचे उपसभापती संपतराव वाजे, देवराम मराडे, अरुण पोरजे, कुंडलिक जमदाडे, रामदास जमदाडे, ठकाजी महाले आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.