चोपड्यात भीषण अपघातात मामलदेचे दोन युवक जागीच ठार

0

चोपडा । चोपडा-लासुर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मामलदे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय-२५) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय-२३) अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मामलदे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, मामलदे येथील अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दोघे मित्र चोपडा येथील कामे आटपून एकाच दुचाकीवरून गावी परतत होते. चोपडा-मामलदे फाटाच्या दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारला. अचानक कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरील वाहनावर आदळली. हा अपघात इतका गंभीर होता की, अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

मयत पृथ्वीराज पाटील याचे सुरत येथे कापडाचे दुकान असून, त्याने दसऱ्याच्या निमित्ताने नुकतीच ही नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. दिवाळीसाठी दोन दिवसांपूर्वीच तो मामलदे येथे घरी आला होता. १६ रोजी अमोलसोबत बाईकवरून चोपड्याकडे जाताना हा अनर्थ घडला.तर मयत अमोल पाटील हा बियाणे कंपनीत नोकरीला होता आणि त्याचे लग्न ठरले होते. साखरपुड्याच्या तयारीला वेग दिला होता, पण दुर्दैवीरीत्या लग्नापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दोघेही एकुलते एक असल्याने, त्यांच्या घरी दीपक विझल्याची चर्चा परिसरात आहे.

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू केला असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.