भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

0

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे.शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

सकाळी अचानक छातीत दु:ख असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचे निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी नगर जिल्हात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी थेट रूग्णाालयाकडे धाव घेतली. शिवाजी कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकि‍र्दला सुरवात केली होते. पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असा प्रवास करून सध्या ते भाजपात होते. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

Leave A Reply

Your email address will not be published.