जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, आज किती रूपयांनी महागले गोल्ड?
जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्यासह चांदीच्या भावात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की.
आज २४कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख २४ हजार १०० रुपयांवर तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ५४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे.


दोन दिवसात सोने अडीच हजाराने तर चांदीत तीन हजार रुपयांनी वाढ
सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी दरात वाढ झाली. या दोन दिवसात सोन्याच्या दरात अडीच हजार रूपयांनी तर आणि चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर सव्वा लाख रूपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून तर चांदीच्या दराने 1 लाख 54 हजारांचा टप्पा पार केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोने आणि चांदीचे दर हे एक सारख्याच पद्धतीने सलग वाढत असल्याचा देखील चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या दारात आणखी मोठी वाढ होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. सोन्याने चांदीच्या वाढलेल्या दरामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. फ्रान्सच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी, याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यात वाढलेली गुंतवणूक ही सोन्याने चांदीच्या दरवाढी मागचे प्रमुख कारण असल्याचा सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे