महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; कफ सिरपच्या विक्रीवर घातली बंदी

0

मुंबई । तुम्ही जर तुमच्या मुलांना खोकला सुरू असल्याने कफ सिरप देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कफ सिरपच्या सेवनाने मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात खळबळ उडाली असून या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली असून सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत परिपत्रक जारी करत म्हटले की, कोल्ड्रिफ सिरप (फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप), बॅच क्रमांक SR-13, Mfg. Dt. मे-2025, Exp. Dt. एप्रिल-2027, स्रेसन फार्मा, सुंगुवरचाथिरम, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू यांनी उत्पादित केले आहे. यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) या विषारी पदार्थाची भेसळ केल्याचा आरोप आहे. Cough Syrup |

हे लक्षात घेता, सर्व परवानाधारक आणि जनतेला कोल्ड्रिफ सिरप, बॅच क्रमांक SR-13 ची विक्री त्वरित थांबवण्याचे आणि विलंब न करता स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर उत्पादन बॅचचा साठा गोठवण्यासाठी तात्काळ सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारकडून टोल फ्री क्रमांक जारी

राज्य सरकारकडून 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा jchq.fda-mah@@nic.in या ईमेलवर किंवा 9892832289 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्ड्रिप सिरप हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक वर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या औषधामधे डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यातील विक्रेते वितरक आणि रुग्णालय यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो गोठवण्याच्या औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.