दिवाळीच्या तोंडावर एसटीची भाडेवाढ, 10 टक्क्यांनी तिकीट महागणार

0

मुंबई । दिवाळीच्या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्याने महामंडळाच्या एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. मात्र एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरात कामासाठी गेलेले चाकरमान्यांना दिवळीला घरी जाताना जास्तीचे शुल्क द्यावे लागणार आहे.

या दरवाढीचा एसटीला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू असणार आहे. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली होती. हे दर एस टीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.आता पुन्हा दिवाळीत एसटीचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या सर्व बसेसाठी ही १० टक्क्यांची दरवाढ नाही. शिवनेरी आणि शिवाई या दोन बसेससाठी जुनेच तिकिटाचे दर असतील. शिवशाही, शिवनेरीसह इतर एसटी बसेसाठी दिवळीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील सर्वसामान्यांना बसणार आहे. आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झालेय. दिवाळी कशी साजरी करायची? हे संकट उभे राहिलेय, त्यात आता एसटीची दरवाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आता एसटी प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.