स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा धामणगाव प्रा. आरोग्य केंद्रात शुभारंभ

0

धामणगाव ता. जळगाव :- सेवा पंधरवाडा व स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या अभियानांतर्गत आज प्रा. आ. केंद्र धामणगाव ता. जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांचे मार्गदर्शक सूचनानुसार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेंद्र बारी , प्रकाश गढरी व प्रतिभा चौधरी यांनी धामणगाव, मुमराबाद व सावखेडा बु. या गावांना आज शिबिर आयोजित करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रा. आ. केंद्र धामणगाव येथे शिबिर शुभारंभ प्रसंगी धामणगाव येथील सरपंच सौ. निशिगंधा सपकाळे, डॉ. अजय सपकाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र बारी , प्रकाश गढरी , प्रतिभा चौधरी, औ. नि. अ. प्रियंका मंडावरे , आरोग्य सेविका वैशाली सपकाळे , आदी उपस्थित होते.

यावेळी शिबिरात ३० वर्षावरील महिलांची असंसर्गिक आजाराची (NCD) तपासणी व उपचार , किशोरवयीन मुली व महिलांची (HB) रक्त तपासणी , गरोदर माता व किशोरवयीन विद्यार्थी यांची सिकलसेल तपासणी , गरोदर मातांना आहार व गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत समुपदेशन , संशयित क्षयरुग्णांची तपासणी व उपचार , आयुष्यमान गोल्डन कार्ड व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करून वितरित करण्यात आले. इ. सेवा शिबिरात देवून ४८० रूग्णानची तपासणी करण्यात आली.

शिबिरात डॉ अजय सपकाळ , डॉ. राहुल बनसोडे व मयुरी शिरसाट यांनी रुग्णांची तपासणी केली. आरोग्य सेविका सुनिता पाटील , एन जे बागरे , शिवानी वाजपेयी , जयश्री कंखरे , आरोग्य सेवक निलेश पाटील , घनश्याम लोखंडे , महेश वाणी , मयुर पाटील , गटप्रवर्तक सुवर्णा नाव्ही , हर्षल चावरे , सुनीलदत्त कोळी , संगीता घेर , मनीषा खंबायत व आशा सेविका आदी वैद्यकीय पथकात सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.