जळगाव जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळणार! हवामान खात्याकडून आगामी चार दिवस येलो अलर्ट जारी

0

जळगाव । राज्यात मागच्या काही दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणी नदी नालयांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान परतीचा पाऊस सुरु झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

जळगाव जिल्ह्यात तर आजपासून २० सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने आज कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागांमधील 21 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.