महाराष्ट्रात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार ! पुढील पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मुंबई । राज्यात दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार ‘कमबॅक’ केले आहे.अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच, बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे
पुढील चार ते पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 17 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणासह उत्तर महाराष्ट्रात मात्र आज पावसाची शक्यता कमी आहे.
पुढील पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
10 सप्टेंबर: अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली.
11 सप्टेंबर: सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
12 सप्टेंबर: पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भ.
13 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भ.
14 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम.