एक प्रसन्न, प्रयत्नवादी, परोपकारी स्वावलंबी सुवर्णमय व्यक्तीमत्व; १ सप्टेंबरला वल्लभ तु. चौधरी यांचा वाढदिवस

0

जळगांव । १ सप्टेंबर २०२५ रोजी श्री.वलभ भाऊंचा वाढदिवस…एका प्रसन्न ,सेवाभावी ,समाजाची उदंड सेवा करणारे ,निगर्वी, प्रामाणिक ,स्वावलंबी ,परोपकारी असलेले त्यांचे कर्तृत्ववान सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचा हा ७५ वा वाढदिवस..अमृत महोत्सवः बोलता बोलता वयाची ७४ वर्ष निघून गेलीत….वदन प्रसन्न, स्मीत हास्य,हसतमुख चेहरा,मितभाषी,कुशल विचारण्याची सवय,आपुलकी, मैत्री , जिव्हाळा निर्माण करण्याची कला सर्वांना आपलेसे करणारी आहे.
कर्म करो वही धर्म है। सेवा करो वहीं सत्कर्म है। स्वतः सामान्य कुटुंबातून आल्यामुळे प्रत्येक गोष्टीची जिद्द व जाणीव त्यांना आहे. सतत उद्योग म्हणजे प्रगती ही विचारधारा त्यांच्या स्वभावात पहायला मिळते.अडलेल्या,नडलेल्या महिला पुरुषांना नेहमी मदत करणे, लाडकी बहीण योजना, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना दलितांपर्यंत सुरु करून देण्याचे अतिशय जिकीरीने प्रयत्न करून मंजूर करून आणतात. मग त्या व्यक्ती, शेतकरी ,शेतमजूर, कामगार, भांडेवाली,सर्वसामान्य व्यक्ती यांची तहसील कचेरीची अडलेली कामे ते पाठपुरावा करून देत असतात.नेक लोगों को संगत से हमेशा भलाई ही मिलती है। क्यों की हवा जब फूलों से गुजरती है;

तो वो भी खुशबूदार हो जाती है।सकाळी Morning walk च्या निमित्ताने हाताच्या ओंजळीत मावतील तेवढीच फुलं ते आणतात. ओंजळभर फुलचं का घेतात ? त्यांनी सहज ओंजळीच महत्व सांगीतले साडेतीन हात लांबीच्या माणसाला; देहाला, ऑजळीत मावेल तेवढचं अन्न पुरेसं असतं –आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा प्रेमळ आशिर्वादही आपण ऑजळीतूनच घेत असतो. सूर्याला अर्घ्य अर्पण करणे, ओंजळीतूनच उषःपानही ओंजळीनच करावयाच असतं. तेवढं पाणी माणसाची तहान (तृष्णा) भागवत, माणसाच्या अनेक कृतीशी आणि भावनांशी ओंजळीच घट्ट नातं असतं.ऑजळ हे दातृत्वाचं रुप आहे. समर्पणाच्या भावनेचंही ते द्योतक आहे. स्वीकारायलाही ओंजळ लागते, तशीच द्यायलाही ती लागते. ओंजळ कधीच रिकामी होत नाही. पारिजातकाने भरलेली ओंजळ सांगते,आधी द्या;मग घ्या ओंजळभर रंग द्या,ओंजळभर गंध द्या,झिरझिरत्या सुखाची,आभाळभर फुलं घ्याबागों में फूलों की बहार बहार हो; जिंदगी में खुशियाँ हजार हो, चाहत की चांदनी हो; अपनों का प्यार हो। चाहा हो जो जिंदगी में;वो सब बेशुमार हो।मेहनत हो,तारीफ हो,आदर हो,दुनिया में पहचान हो; और बडासा नाम हो।मेरी और से तोहफे में उम्र सौ साल हो। जन्म दिन की हार्दिक बधाई हो l

Leave A Reply

Your email address will not be published.